¡Sorpréndeme!

Amit Shah Meeting Eknath Shinde | एकनाथ शिंदे आणि अमित शाहांच्या त्या भेटीत काय घडलं? Special Report

2025-04-13 92 Dailymotion

Amit Shah Meet DCM Eknath Shinde  
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा महाराष्ट्र दौरा..
निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी... त्यांचा हा सगळा कार्यक्रम आटोपला, त्यानंतर दुसऱ्या दिवशी अमित शाहा सह्याद्री अतिथीगृहातून पुन्हा परताना, एक मोठी भेट झाली, ती भेट होती एकट्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतची... आणि याच भेटीभोवती दिवसभर राजकीय वर्तुळाची कशी चर्चा रंगली होती याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहुया 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्यातील शेवटचा एक तास महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सर्वाधिक लक्षवेधी ठरला.  त्याचं कारण म्हणजे अमित शाह भोपाळला रवाना होण्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेली भेट.  मुख्यमंत्री नागपुरात असताना आणि अजितदादा बारामतीत असताना झालेल्या या भेटीनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.   कालपासून एकमेकांसोबत असणाऱ्या अमित शाहा आणि एकनाथ शिंदेंना असं शेवटच्या क्षणी एकमेकांची भेट घेण्याची गरज का पडावी, असा सवाल विचारला जाऊ लागला.   पण या सवालाचा जबाब कुणाकडेच नव्हता.